जळगाव जिल्ह्याचे चित्र बदलणार : नार-पार योजनेसाठी निविदा काढण्याला मान्यता ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा


The picture of Jalgaon district will change: approval for drawing tenders for Nar-Par scheme; Announcement by Deputy Chief Minister Devendra Fadnavis जळगाव (25 ऑगस्ट 2024) : जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सुजलाम सुफलाम करणार्‍या नार-पार योजनेला मान्यता देण्यात आली असून आजच कॅबीनेटच्या बैठकीत योजनेसाठी निविदा काढण्यात येईल, अशी घोषणा जळगावात लखपती दीदी मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते म्हणाले की, वाघूर प्रकल्पासाठी दोन हजार 288 व पाडळसे प्रकल्पाला चार हजार 890 कोटी रुपये मंजूर केल्याचे ते म्हणाले.

जिल्ह्यातील भाविकांना वाहिली आदरांजली
फडणवीस यांनी नेपाळ बस दुर्घटनेतील मृतांप्रती शोकसंवेदना व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सुजलाम सुफलाम करणारी योजना नार-पारला यापूर्वीच मंजुरी देण्यात आली असून आज कॅबीनेट बैठकीत निविदा काढण्यास मान्यता देण्यात येणार आहे. या योजनेमुळे शेतकर्‍यांना शेतीला पाणी मिळेल. आजच्या कार्यक्रमाला आलेल्या महिलांनी संख्येचे आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. महिला अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आल्या तरच भारत विकसित होईल, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.






 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !