सोनगीरनजीक 12 लाखांचा गुटखा पकडला : परप्रांतीय दोघे जाळ्यात

सोनगीर पोलिसांची गोपनीय माहितीवरून कारवाई : तस्करी ऐरणीवर


Gutkha worth 12 lakhs caught near Songira : Two foreigners in the net धुळे (5 सप्टेंबर 2024) : सोनगीर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मुंबईकडे होणारी गुटख्याची तस्करी रोखत कंटेनरमधून सुमारे 12 लाखांचा प्रतिबंधीत गुटखा व तंबाखू जप्त केली आहे. या कारवाईने गुटखा तस्कर हादरले असून तस्करी पुन्हा ऐरणीवर आली आहे. गुरुवार, 5 सप्टेंबर रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

युपीतील हरियाणातील आरोपी जाळ्यात
सोनगीरचे सहाय्यक निरीक्षक सचिन कापडणीस यांना मुंबईकडे प्रतिबंधीत गुटख्याच्या वाहतुकीबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले होते. गुरुवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास सोनगीर फाट्यावर कंटेनर (आर.जे.11 जी.सी.6615) आल्यानंतर त्याची तपासणी केली असता त्यात प्रतिबंधीत गुटखा व तंबाखू असल्याने कंटेनर जप्त करण्यात आला. पंचांसमक्ष गुटख्याची मोजणी केल्यानंतर 10 लाख 45 हजार 440 रुपये किंमतीचा प्रतिबंधीत राजनिवास सुगंधी पानमसाला, एक लाख 36 हजार रुपये किंमतीची सुगंधी तंबाखू व 15 लाख रुपये किंमतीचा कंटेनर असा एकूण 26 लाख 81 हजार 440 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कंटेनर चालक महंमद समीम इद्दुखान (हाजीपूर, काजीमपूर बघेल, जि.रायबरेली, उत्तरप्रदेश) व क्लीनर पवन जयभगवान शर्मा (मंदठाना, जि.भिवानी, हरियाणा) यांना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक संजय बाबंळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनगीरचे सहाय्यक निरीक्षक संजय कापडणीस, पोलीस उपनिरीक्षक संदीप ठाकरे, किरण राजपूत, युसूफ शेख, हरीष गढरी, पंकज चौधरी, अमरीश सानप, जगदीश अहिरे, विजय पाटील आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.