धुळ्यात कॉपर वायर स्क्रॅपच्या बहाण्याने बोलावत गुजरातच्या व्यापार्‍याला मारहाण करीत साडेसहा लाखांचा ऐवज लुटला


A businessman from Gujarat was beaten up on the pretext of copper wire scrap in Dhula and robbed of six and a half lakhs. धुळे (9 सप्टेंबर 2024) : स्क्रॅपमधील कॉपर केबल स्वस्तात देण्याच्या बहाण्याने गुजरातच्या व्यापार्‍याला बोलावून संशयीतांनी त्यास बेदम मारहाण करीत सुमारे साडेसहा लाखांचा ऐवज लूटला. ही धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी धुळे तालुक्यातील सडगाव शिवारात घडली. याप्रकरणी धुळे तालुका पोलिसात नऊ संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
गुजरातच्या बडोद्यातील व्यापारी कुणाल पटेल (37) यांच्याशी नितीन भोसले नामक संशयीताने स्क्रॅप कॉपर वायर विक्री संदर्भात संपर्क साधला. पटेल यांच्यासह तीन सहकारी गुरुवारी कारने येत असताना दुचाकीवरून त्यांना सडगाव शिवारात नेण्यात आले. हेंकळवाडीजवळ आधीच लपून बसलेल्या 7 ते 8 संशयितांनी पटेल यांची गाडी अडवत कारमधील विशाल पटेल, आदित्य पटेल, विनय पटेल, तीर्थ पटेल या सर्वांना गाडीबाहेर काढून जबर मारहाण केली तसेच खिशामधून मोबाईल, सोन्याची अंगठी, अमेरिकन डायमंडची अंगठी, सोन्याचे ब्रेसलेट, गाडीत ठेवलेली रोकड याशिवाय क्युआर कोडद्वारे बळजबरीने पैसे काढून एकूण सहा लाख 46 हजार 900 रुपये किंमतीचा ऐवज लुटून नेला.






नऊ संशयीतांविरोधात दरोड्याचा गुन्हा
शुक्रवारी रात्री संशयित कुणाल पटेल यांच्या फिर्यादीवरून आरोपी नितीन भोसलेसह संशयितांवर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !