धुळे शहरातील अट्टल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

86 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त : गुन्हे उघडकीस येणार


Attal Chorta in Dhule city in the net of local crime branch धुळे (13 सप्टेंबर 2024) : धुळे गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे अट्टल चोरट्याला अटक केली असून रामदेव बाबा नगरातील घरफोडीची आरोपीने कबुली देत 86 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल काढून दिला आहे. मिनाज महंम्मद रमजान अन्सारी (25, तिरंगा मशीद, 80 फुटी रोड, अन्सार मशिदीजवळ, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीतीवरून कारवाई
विजय मुरलीधर सियसाAttal Chorta in Dhule city in the net of local crime branchल (रामदेव बाबा नगर, धुळे) यांच्या बंद घरातून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह रोकड लांबवली होती. 19 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या घरफोडी प्रकरणी आझाद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेकडून समांतर तपासात संशयीत अन्सारीचे नाव समोर आल्यानंतर त्यास ताब्यात घेवून बोलते केल्यानंतर त्याने घरफोडीची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातून 60 हजारांचे मंगळसूत्र, दहा हजारांचे ब्रेसलेट, पैंजण, वाळे, अंगठी व दोन हजारांची रोकड मिळून 86 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरोधात आझादनगरला दोन तर देवपूर व पश्चिम देवपूर पोलिसात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे






यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, संजय पाटील, नाईक रवीकिरण राठोड, कॉन्स्टेबल सुशील शेंडे, कॉन्स्टेबल निलेश पोतदार, कॉन्स्टेबल विवेक वाघमोडे, कॉन्स्टेबल हर्षल चौधरी आदींच्या पथकाने केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !