कौटूंबिक वादातून नवापूरात विवाहितेची हत्या : पती, दीरासह तिघांना बेड्या

24 तासात गुन्ह्याची उकल करण्यात नवापूर पोलिसांना यश : आरोपींना सात दिवसांची कोठडी


Murder of married woman in Nawapur due to family dispute : Husband, Deera along with three chained नवापूर (13 सप्टेंबर 2024) : कौटूंबिक वादाची तक्रार खाटीक जमातीत केल्याच्या रागातून सख्ख्या दीराने 32 वर्षीय वहिनीची गळा आवळून हत्या करीत मृतदेहाची मित्राच्या मदतीने विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार नवापूर शहरातील आदर्श नगरात गुरुवार, 12 रोजी उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. नवापूर पोलिसांनी अत्यंत बारकाईने या गुन्ह्याचा तपास केल्यानंतर मयताच्या पती, दीरासह तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या. रुकसाना आसीफ खाटीक (32) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

पती, दीरासह तिघांना अटक
हवालदार दादाभाऊ वाघ यांच्या फिर्यादीवरुन छोटू खाटीक व संतोष बाला गावीत यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला तर पोलिसांच्या तपासात सहा आरोपी निष्पन्न झाले असून विवाहितेचा पती व संशयीत आसीफ छोटू खाटीक यास अटक करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत करीत आहेत. अटकेतील आरोपींना शुक्रवारी न्यायालयाने 19 पर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

यांनी केली गुन्ह्याची उकल
नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, पो.ह. दादाभाऊ वाघ, नितीन नाईक, दिनेशकुमार वसुले, कैलास तावडे, गणेश बच्छे, संदिप सोनवणे, दीपक पाटील, विजय पवार, मोगी पावरा आदींच्या पथकाने गुन्ह्याची उकल केली.

आरोपींविरोधात हवी कठोर कारवाई : समाजाची मागणी
खून प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी नवापूर येथील समस्त खाटीक समाज बांधवांनी नवापूर पोलीस प्रशासनाकडे केली. निवेदनावर सादीक, आरीफ भाई, हरफाम भाई, हारून भाई, ईरफान भाई, इलियास भाई आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.


कॉपी करू नका.