मराठा समाज एकवटला : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचे उपोषण

0

Maratha society unites: Manoj Jarange Patal’s hunger strike for Maratha reservation आंतरवाली सराटी (17 सप्टेंबर 2024) : आंतरवाली सराटीत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उपोषणाला प्रारंभ केला आहे. मनोज जरांगे हे सहाव्यांदा उपोषणाला बसले असून राज्यभरातून समाजबांधव या उपोषणात सहभागी होत आहेत.

तर फडणवीस जबाबदार असतील
मनोज जरांगे यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली होती. मराठा समाजाने राज्य सरकारला दिलेली ही आणखी एक संधी असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. आम्हाला या माध्यमातून कोणतेही राजकारण करायचे नाही. मात्र, आम्ही राजकारण करू नये असे वाटत असेल तर आमच्या मागण्या पूर्ण करा, अशी मागणी देखील जरांगे यांनी केली. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर त्यासाठी देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असतील, असा आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमधील काही माकडांना सांगावे की, मनोज जरांगे पाटील हा फक्त मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसला आहे. निवडणुकीशी आम्हाला देणे-घेणे नाही.

मध्यरात्रीपासून उपोषण
सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी तसेच हैदराबाद सातारा आणि बॉम्बे गव्हर्मेंटचे गॅझेट लागू करावे यासह मराठा आंदोलकावरील आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी मंगळवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाला सुरवात केली आहे.


कॉपी करू नका.