श्री विसर्जनासाठी गेलेल्या भावंडांचा तलावात बुडाल्याने मृत्यू : धुळ्यातील घटना


Siblings who had gone for Sri Visarjan drowned in the lake : incident in Dhula धुळे (18 सप्टेंबर 2024) :  गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोघा भावंडांचा तलावात बुडाल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवार, 17 रोजी बिलाडी, ता.धुळे येथे घडली. या घटनेत एक जण सुदैवाने बचावला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली आहे. ओम पाटील (18) आणि यश पाटील (20, वारे नगर, बिलाडी रोड, धुळे) अशी मयतांची नावे आहेत.

पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू
पाटील भावंडे श्री विसर्जनासाठी बिलाडीजवळील तलावात आले असता पाण्याचा अंदाज न आल्याने तलावातील खोलीचा अंदाज न आल्यामुळे बुडाली तर त्यांच्यासोबतच्या एका मित्राला वाचवण्यात यश आले. दोघांचे पार्थिव शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. या घटनेनंतर हळहळ व्यक्त करण्यात आली.

 


कॉपी करू नका.