दोंडाईचा नाभिक समाजाच्या शहराध्यक्षपदी दिलीप सैंदाणे

0

दोंडाईचा (19 सप्टेंबर 2024) : समाज कामात नेहमी अग्रेसर असलेले तसेच समाजाचे विविध पद भूषवलेले दिलीप सैंदाणे यांची दोंडाईचा शहर नाभिक समाज हितवर्धक संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

समाजातील गुणवंतांचा गौरव
16 सप्टेंबर रोजी दोंडाईचा शहर नाभिक समाजातील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण कार्यक्रम तसेच समाजातील विशेष निवड तसेच विविध पद भूषवलेल्या मान्यवर व्यक्तींचा सत्कार समारंभ तसेच वार्षिक मीटिंग दादासाहेब रावल स्टेडियम येथे संपन्न झाली. यावेळी नर्सरी ते ग्रॅज्युएशन पर्यंत एक ते तीन मध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना समाजाच्या वतीने बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

यांची विचार मंचावर उपस्थिती
विचार मंचावर धुळे जिल्हा नाभिक दुकानदार संघटनेचे जिल्हाअध्यक्ष रवींद्र सैंदाणे, तालुकाध्यक्ष रवींद्र चित्ते, शहराध्यक्ष छोटू महाले, प्रा.डॉ.सुनील पवार, युवक मंडळाचे शहराध्यक्ष समाधान ठाकरे, दुकानदार संघटनेचे अध्यक्ष किरण सूर्यवंशी, महिला मंडळाचे अध्यक्ष वत्सलाबाई चित्ते, उपाध्यक्षा ज्योती सैंदाणे उपस्थित होते. शहरातील सर्वच एक ते तीन क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन एकत्रित सत्कार करण्यात आला.

सुनील सैंदाणे यांची एकमताने निवड
दुपारनंतर वार्षिक सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी नाभिक समाज हितवर्धक संस्थेचे अध्यक्ष पदाचा एक नाव समोर आल्याने दिलीप सैंदाणे यांची तर सचिव पदी सुनील सैंदाणे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी अनिल ईशी तर सचिवपदी महेंद्र चित्ते यांची निवड करण्यात आली. युवक मंडळाच्या शहराध्यक्षपदी राजेश मिस्तरी तर सचिवपदी जगदिश ईशी यांची निवड करण्यात आली. महिला मंडळाच्या शहराध्यक्षपदी वत्सलाबाई चित्ते यांची निवड करण्यात आली. या सर्व नवनिर्वाचित अध्यक्षांच्या माजी अध्यक्षांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. भंडारा आयोजन हे मुरलीधर भिका बोरसे यांनी केले होते.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी बन्सीलाल चित्ते, साहेबराव पवार, राजेंद्र मोरे, छोटू चित्ते, राजेंद्र सोलंकी, कैलास चित्ते, भरत वरसाळे, अनिल सोनवणे, योगेश मिस्तरी, विशाल महाले, मुकेश चित्ते, अजय ईशी, दिनेश बोरसे, प्रविण सैंदाणे, संदीप पवार,.रोहित सैंदाणे, सुजय पवार, योगेश सूर्यवंशी, भरत जयपाल, भरत सैंदाणे, अर्जुन चित्ते, गुलाब पवार, रमेश खोंडे यासह समाजातील महिला पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कॉपी करू नका.