माजी पोलिस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये ; वर्सोव्यातून लढणार !
Former Police Commissioner Pandey in Congress; Will fight from Warsaw! मुंबई (20 सप्टेंबर 2024) : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी गुरुवारी मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबतच अजित पवार गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनीही पक्षांतर केले. दरम्यान, पांडे यांना फोन टॅपिंग प्रकरणात 25 सप्टेंबर 2022 रोजी अटक झाली होती हे विशेष !
सीबीआयने केली पांडे यांच्यावर कारवाई
2009 ते 2017 या कालावधीत नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (एनएसई) कर्मचार्यांचे फोन टॅपिंग केले, असा ठपका ठेवून पांडे यांना सीबीआयने अटक केली होती.
वर्सोव्यातून लढणार
पांडे यांनीकाँग्रेसमध्ये सांगितले की, काँग्रेस हा एक परिवार असून 140 वर्षांचा जुना व अनुभवी पक्ष आहे. राहुल गांधी यांनी ‘डरो मत’चा संदेश दिला आहे. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यानंतर कोणालाही घाबरण्याचे कारण नाही. काँग्रेसचे विचार महत्त्वाचे आहेत. मला अनेक पक्षातून ऑफर होती, असा दावाही त्यांनी केला. पांडे हे काँग्रेसकडून वर्सोवा विधानसभा लढण्याची शक्यता आहे. मध्यंतरी त्यांनी लोकसभा लढण्याचीही तयारी केली होती. मात्र, काही राज्यस्तरीय नेत्यांनी विरोध केल्याने ऐनवेळी त्यांनी माघार घेतली.