माझ्या गणेश पूजनाने काँग्रेस अस्वस्थ : पंतप्रधान नरेंद्र मोदी


Congress upset by my Ganesh Puja : PM Narendra Modi वर्धा (20 सप्टेंबर 2024) : जुन्या सरकारमध्ये कामगारांच्या कौशल्याचा आदर केला जात नव्हता. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रांनी एससी/एसटीला दडपून ठेवले. त्यांना पुढे जाऊ दिले नाही, असा घणाघात वर्धा येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. मोदी म्हणाले की, काँग्रेसमधील देशभक्तीच्या आत्म्याने प्राण सोडला आहे. परदेशातून बसून ते अजेंडा चालवतात. आता त्यांना गणपती बाप्पाचीही चीड येऊ लागली आहे. मी गणेशपूजन केले तेव्हा काँग्रेस अस्वस्थ झाली होती, असा आरोप त्यांनी केला.

आठ लाख लोकांना प्रशिक्षण
महाराष्ट्रातील वर्धा येथील सभेत मोदींनी संबोधित केले. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते येथे आले होते. पंतप्रधान म्हणाले की, आमच्या सरकारने कौशल्य मंत्रालयाची निर्मिती केली. पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरू केली. या योजनेंतर्गत एका वर्षात 8 लाख लोकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे.

काँग्रेसला गणपती पूजेचा तिटकारा
पीएम मोदी म्हणाले की, ज्या पक्षाला आपल्या आस्था आणि संस्कृतीचा किंचितही आदर आहे तो कधीच गणपती पूजेला विरोध करू शकत नाही. पण आजच्या काँग्रेसला गणपती पूजेचा तिटकारा आहे. मी गणेशपूजनाच्या कार्यक्रमाला गेलो तेव्हा काँग्रेसचे तुष्टीकरणाचे भूत उठले. काँग्रेसने गणपती पूजेला विरोध सुरू केला. वास्तविक, पंतप्रधान मोदी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गणपती पूजनासाठी गेले होते. ज्याला विरोधकांनी विरोध केला होता.


कॉपी करू नका.