मालेगावातील अट्टल चोरट्याकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त : धुळे गुन्हे शाखेची कामगिरी

मालेगावसह चाळीसगाव ग्रामीणमधून चोरल्या दुचाकी


Four stolen two-wheelers recovered from a staunch thief in Malegaon : Dhule Crime Branch’s performance धुळे (25 सप्टेंबर 2024) : धुळे गुन्हे शाखेने मालेगावातील अट्टल दुचाकी चोरट्याला अटक करीत त्याच्याकडून सव्वा लाख रुपये किंमतीच्या चार दुचाकी पूरमेपाडा शिवारातून जप्त करण्यात आल्या आहेत. मालेगावसह चाळीसगाव ग्रामीण हद्दीतून आरोपीने या दुचाकी चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. शाहरुख रशीद शहा (29, ईस्लामपूरा, प्लॉटन नंबर 19, मालेगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारावई
धुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना चोरट्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्याची आदेश त्यांनी दिले. संशयीत पूरमेपाडा शिवारात हिरो डिलक्स दुचाकीसह उभा असताना त्यास ताब्यात घेवून विचारपूस केल्यानंतर त्याने सव्वा लाख रुपये किंमतीच्या चार दुचाकी पुरमेपाडा गावाच्या शिवारातून काढून दिल्या. दोन दुचाकी या चाळीसगाव ग्रामीण हद्दीसह छावणी, ता.मालेगाव हद्दीतून चोरी केल्याचे स्पष्ट झाले असून अन्य दोन दुचाकींबाबत तपास सुरू आहे. दरम्यान, आरोपी शाहरूख शहा विरोधात मालेगाव तालुका व पवारवाडी, मालेगाव येथेदेखील दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, हवालदार दिनेश परदेशी, सचिन गोमसाळे, कॉन्स्टेबल विवेक वाघमोडे यांनी केली आहे.


कॉपी करू नका.