भुसावळ विभागात स्वच्छता भारत मिशन स्पर्धा


भुसावळ (26 सप्टेंबर 2024) : स्वच्छता ही सेवा मोहिमेच्या अंतर्गत भुसावळ विभागाने स्वच्छता भारत मिशन स्पर्धेचे आयोजन केले. ही स्पर्धा भुसावळातील रेल्वे शाळा आणि बेसिक प्रशिक्षण केंद्र (बीटीसी) मध्ये आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाशी संबंधित विविध विषयांवर सहभाग घेतला.

डीआरएम यांनी केले उद्घाटन
स्पर्धेत स्वच्छ पर्यावरण, स्वच्छ रेलगाडी, स्वच्छता ही सेवा, स्वच्छ भारत सुंदर भारत, प्लास्टिक मुक्त भारत, आणि वृक्षारोपणाचे महत्त्व यासारख्या विषयांवर चित्रकला आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलाया. भुसावळ रेल्वे शाळेत विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन डीआरम ईती पांडेय यांच्याहस्ते झाले. या प्रदर्शनीमध्ये रेल्वे शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली उत्पादने प्रदर्शित करण्यात आली. अपर मंडल रेल प्रबंधक प्रशासन सुनील कुमार, सर्व शाखा अधिकारी, रेल्वे शाळेचे प्राचार्य, तसेच शिक्षक उपस्थित होते.














मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !