सोनेवाडीतील भावंडांचा तापी पात्रात बुडाल्याने मृत्यू


शिंदखेडा (02 ऑक्टोबर 2024) : घटस्थापनेपूर्वी कानबाई मातेची तापी पात्रात अंघोळ घालण्यासाठी गेलेल्या भावंडांचा तापी पात्रात बुडून मृत्यू झाला. शिंदखेडा तालुक्यातील सोनेवाडी गावातील तापी पात्रात ही घटना बुधवारी सकाळी घडली. वैष्णवी सुरेश पाटील (17) व उत्कर्ष रमेश पाटील (13, दोन्ही रा.सोनेवाडी) अशी मयत भावंडांची नावे आहेत.

पाटील परिवारातील सदस्य गावाजवळील बुधवारी तापी नदीपात्रावर घटस्थापनेनिमित्त गेल्यानंतर भावंडांचा तापी पात्रात बुडाल्याने मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने वैष्णवी पाटील आणि उत्कर्ष पाटील दोन्ही भावंडे बुडाली. एक तासानंतर उत्कर्ष आणि वैष्णवी यांचा तापी नदीपात्रात मृतदेह आढळला.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !