धुळ्यात दोन लाखांचे डीजे साहित्य लांबवले : चोरट्याला यंत्रणेकडून बेड्या
धुळे (02 ऑक्टोबर 2024) : डीजे वाहनातून एक लाख 85 हजारांचे साहित्य चोरी करणार्या चोरट्याला धुळे गुन्हे शाखा व पश्चिम देवपूर पोलिसांनी संयुक्त कारवाईत अटक करीत चोरी केलेले साहित्य जप्त केले. गणेश राजेंद्र मराठे (23, नगावबारी, देवपूर, धुळे) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. वैभव सुभाष ठाकरे (20, धनदाई नगर, देवपूर, धुळे) यांच्या वाहनातून चोरट्यांनी एक लाख 85 हजारांचे साहित्य लांबवल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल होता.
तपासात आरोपी गणेश मराठेसह त्याचे साथीदार विशाल मालचे व अजय वडार (दोन्ही नगावबारी) यांचे नाव समोर आले मात्र संशयीत पसार झाले. संशयीत गणेशच्या ताब्यातून चोरी केलेले साहित्य जप्त करण्यात आले.





यांनी केली कारवाई
धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार, पश्चिम देवपूरचे सहा.निरीक्षक तुषार देवरे, अमित साळी, हवालदार प्रकाश सोनार, योगेश चव्हाण, रवी राठोड, निलेश पोतदार, सुशील शेंडे, विवेक वाघमोडे, हर्षल चौधरी तसेच पश्चिम देवपूरचे हवालदार मनोज साठे, कॉन्स्टेबल सुनील राठोड, किरणकुमार साळवे आदींच्या पथकाने केली.
