ईव्हीएम शंभर टक्के निर्दोष ; प्रश्न उपस्थित करणार्यांना जनता उत्तर देईल : निवडणूक आयुक्त राजीवकुमार
EVMs are hundred percent flawless; People will answer those who raise questions: Election Commissioner Rajeev Kumar मुंबई (15 ऑक्टोबर 2024) : ईव्हीएम योग्य असल्याचे यापूर्वीही अनेकदा सिद्ध झाले आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही. ईव्हीएम 100 टक्के निर्दोष आहेत. जनता मतदानात सहभागी होऊन प्रश्न उपस्थित करणार्यांना योग्य उत्तर देईल, अशी प्रतिक्रिया एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी व्यक्त केली.
मशीनच्या बॅटरीवर उपस्थित झाले होते प्रश्नचिन्ह
निवडणूक तारखांच्या घोषणेपूर्वी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ईव्हीएमवर विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर दिले. हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यापासून पक्षाचे वरिष्ठ नेते ईव्हीएमवर सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. निकालानंतर दुसर्याच दिवशी पवन खेडा आणि जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएममधील त्रुटी सांगितल्या. याप्रकरणी त्यांनी मशीनच्या बॅटरीवर प्रश्न उपस्थित करत तक्रारही केली. यानंतर राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंह यांनी शुक्रवार, 11 ऑक्टोबर ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला.





सध्याच्या ईव्हीएम व्यवस्थेमुळे मतदार म्हणून त्यांचा घटनात्मक अधिकार हिरावून घेतला जात असल्याचे ते म्हणाले. पोस्टल बॅलेटच्या मोजणीनुसार मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीप्रमाणेच हरियाणा विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने बहुतांश जागा जिंकल्याचा दावाही त्यांनी केला.
बॅलेट पेपरद्वारे मतदानाची मागणी
काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. ते मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024 रोजी म्हणाले, महाराष्ट्रातील विरोधकांनी ईव्हीएमऐवजी कागदी मतपत्रिकांद्वारे मतदान करण्याचा आग्रह धरला पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रातील भाजप सरकार आणि निवडणूक आयोग काहीही करू शकतात.
#WATCH | Delhi: On questions being raised by opposition parties over EVMs, Chief Election Commissioner, Rajiv Kumar says “The public answers the questions by participating in the voting. As far as the EVMs are concerned, they are 100% foolproof…” pic.twitter.com/CAkARkw15m
