भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन


भुसावळ (16 ऑक्टोबर 2024) : शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात 15 रोजी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा वाढदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून ग्रंथालय विभाग व राष्ट्रीय सेवा योजना एककतर्फे साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.के.अग्रवाल होते. याप्रसंगी पूर्व राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस मार्ल्यापण करण्यात आले.

वाचनानेच कठीण प्रसंगांना देता येईल मात
डॉ.एस.के. अग्रवाल यांनी जीवनात वाचनाचे महत्त्व खूप आहे आणि त्या वाचनानेच तुम्ही जीवनातील कठीण प्रसंगांना मात देऊ शकतात व तुमचा आत्मविश्वास वाढवू शकतात, असे सांगितले. आजच्या युगात मोबाईलचे वाढते व्यसन हे धोकेदायक आहे आणि याचे दुष्परिणाम समाजात दिवसेंदिवस वाढत आहे ते दुष्परिणाम कमी करण्यासाठी वाचन अत्यावश्यक आहे , असे त्यांनी नमूद केले. यानंतर विद्यार्थिनींनी ग्रंथालय विभागात आयोजित पुस्तक प्रदर्शनाला भेट देऊन पुस्तकांचे वाचन केले.

कार्यक्रमास महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.जे.पी.तळेगावकर, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ.मीना चौधरी, प्रा.एस.बी.नेतनराव, सहाय्यक रासेयो अधिकारी व महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. विलास सरोदे, ग्रंथालय सहाय्यक व हरी पाटील यांनी परिश्रम घेतले. आभार रासेयो सहाय्यक अधिकारी प्रा.निलेश गुरचळ यांनी मानले.


कॉपी करू नका.