शिपाई पदावर नोकरीसाठी दोन लाखांची लाच : पिंप्री खुर्द शाळेचा सचिव जळगाव एसीबीच्या जाळ्यात


Bribe of two lakhs for job as constable: Secretary of Pimpri Khurd School in Jalgaon ACB’s net जळगाव (17 ऑक्टोबर 2024) : शिपाई पदावर नोकरी लावण्यासाठी दहा लाखांची लाच मागून तत्काळ दोन लाखांची लाच स्वीकारणार्‍या एरंडोल तालुक्यातील पिंप्री खुर्द शाळेतील सचिवाला जळगाव एसीबीने अटक केली आहे. विनोद मधुकर चौधरी (53, रा.गट नंबर 53+54, साई आनंद अपार्टमेंट, शिव कॉलनी, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

असे आहे लाच प्रकरण
54 वर्षीय तक्रारदार पिंपळकोठा खुर्द, ता.एरंडोल गावातील रहिवासी असून त्यांचा मुलगा हा वेदमाता गायत्री बहुउद्देशीय संस्था, पिंप्री खुर्द, ता.धरणगाव जि.जळगां संचलित 20 टक्के शासकीय अनुदानित आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, भोद खुर्द शिवार येथे 2021 पासून अनुसूचित जाती या प्रवर्गातील शिपाई पदावर नोकरीस होता. त्यावेळी संशयीत आरोपी व सचिवांनी सात लाख 70 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर तक्रारदार यांच्या मुलास सचिव विनोद मधुकर चौधरी यांनी तक्रारदाराच्या मुलाला 2012 पासून कमी केले व ही जागा 2012 पासुन रिक्त पद दाखवून त्या जागेवर तक्रारदार यांचा भाचा राजेश यास शिपाई पदावर नोकरी लावण्यासाठी व शासनाकडून मंजुरी आणून देण्यासाठी तक्रारदाराकडे 15 ऑक्टोबर रोजी 10 लाख रुपये लाच मागितली व त्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली. तत्काळ दोन लाख रुपये व शासनाकडून मंजुरी प्राप्त झाल्यावर तीन लाख रुपये व पहिला पगार सुरू झाल्यावर पाच लाख रुपये असे टप्प्या-टप्प्याने 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली तसेच यापूर्वी दिलेले सात लाख 70 हजार रुपये विसरून जा, असे सांगण्यात आले.

राहत्या घरी स्वीकारली लाच
दहा लाखांपैकी लाचेतील दोन लाख रुपये पहिला जप्त म्हणून राहत्या घरी जळगावात स्वीकारताना आरोपी विनोद चौधरी यांना जळगाव एसीबीने ताब्यात घेत त्यांच्याविरोधात रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, दिनेशसिंग पाटील, सुनील वानखेडे, प्रणेश ठाकूर आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.


कॉपी करू नका.