लिप्ट दिली अन् दुचाकी लांबवली : धुळ्यातील मोहाडी पोलिसांकडून आरोपी जाळ्यात


Gave a lift and extended the bike : Accused arrested by Mohadi police in Dhule धुळे (18 ऑक्टोबर 2024) : मित्राची दुचाकी घेवून नवलाणेतील शेतकरी धुळ्यात आले व परतीच्या प्रवासात त्यांनी माणुसकी म्हणून एकाला वाहनावर बसवले मात्र नैसर्गिक विधीसाठी त्यांनी दुचाकी थांबवल्यानंतर भामट्याने दुचाकीला असलेली चावी पाहता काही क्षणात दुचाकी लांबवली. मोहाडी पोलिसांनी भामट्याला 48 तासात हुडकून काढत त्यास बेड्या ठोकल्या. सचिन तुकाराम मिस्तरी (29, रा.मोहाडी उपनगर) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. आरोपीकडून चोरलेली दुचाकी जप्त करण्यात आली.

असे आहे दुचाकी चोरी प्रकरण
नवलाणे, ता.धुळे येथील शांतीलाल दयाराम बागुल (49) हे 9 ऑक्टोंबर रोजी कामानिमित्त मित्र बाबुलाल पांडु कोळपे यांची 50 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.18 सी.बी. 7129) घेवून धुळ्यात आले व काम आटोपताच दुचाकीने ते नवलाणेकडे निघाले मात्र चाळीसगाव चौफुलीजवळील पंपाजवळ अनोळखीने लिप्ट मागितल्याने बागुल यांनी माणुसकी धर्म जोपासला मात्र बागुल यांना नैसर्गिक विधी आल्यानंतर त्यांनी हॉटेल 55555 च्या सर्व्हिस रोडलगत दुचाकी थांबवली. यावेळी दुचाकीलाच चावी राहिल्याची संधी आरोपीने साधत दुचाकी लांबवली. मोहाडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले.






यांनी आणला गुन्हा उघडकीस
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील व सहकार्‍यांनी केली. तपास हवालदार प्रभाकर सोनवणे करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !