कत्तलीपूर्वीच 28 गोवंशाची शिरपूर तालुका पोलिसांकडून सुटका

सात लाख 53 हजारांचा मुद्देमाल जप्त : सात संशयीतांविरोधात गुन्हा


28 cows released by Shirpur taluka police before slaughter शिरपूर (21 ऑक्टोबर 2024) : गोवंशाची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होत असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला सोबत घेत 28 गोवंशाची सुटका केली. सात पैकी तीन संशयीतांना अटक करण्यात आली तर चौघे मात्र जंगलात पसार झाले. ही कारवाई 18 रोजी सकाळी 10.30 वाजता करण्यात आली. दोन वाहनांसह सात लाख 53 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सहा संशयीतांविरोधात गुन्हा
कढईपाणी (उमर्दा) येथे गोवंशाची कत्तलीसाठी तस्करी होत असताना पोलिसांनी छापेमारी करीत 28 गोवंशाची सुटका केली तसेच तीन लाख रुपये किंमतीची पिकअप (एम.एच.04 डी.के.5938) व पिकअप (एम.पी.68 जी.0585) मिळून सात लाख 53 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयीत सयाराम उर्फ पुठ्ठण आनसिंग पावरा, दयाराम आनसिंग पावरा (कढईपाणी, उमर्दा), लतीफ शेख रज्जाक (40, गणेश कॉलनी, शिरपूर), अबरार शेख अमीर शेख (शिरपूर), जाकीर मन्सुरी (मनावर, मध्यप्रदेश), जफर युसूफ मजावर (शिरपूर), बादल गंगाराम चौहाण (सेंधवा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेतील तीन संशयीतांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका निरीक्षक जयपाल हिरे, हवालदार संतोष पाटील, दिनेश सोनवणे, स्वप्नील बांगल, सुनील पवार, जयेश मोरे, चालक मनोज पाटील, चालक सागर कासार आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.