धुळे जिल्हा पोलिस दलाची मोठी कारवाई : सहा पिस्टलसह 17 तलवारी जप्त


धुळे (23 ऑक्टोबर 2024) : आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करताना धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या नेतृत्वात मंगळवारी संपूर्ण जिल्ह्यात यंत्रणेने नाकाबंदी केली. शिरपूर येथे एका वाहनातून तलवारीचा मोठा साठा जप्त करण्यात आला तर दुसर्‍या अन्य कारवायांमध्ये सहा पिस्टल जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली.

पोलिसांची मोहिम सुरूच राहणार
धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे हे मंगळवारी स्वतः रस्त्यावर उतरले होते तर जिल्ह्यातील यंत्रणेकडून ठिकठिकाणी कसून वाहन तपासणी करण्यात आली. शिरपूरात एका वाहनातून पोलिसांना तलवारीचा मोठा शस्त्र साठा सापडला तर अन्य कारवायांमध्ये एकूण सहा पिस्टल सापडल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात आज दुपारी पत्रकार परिषदेत माहिती दिली जाणार आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !