दोन लाखांची लाच मागणी भोवली : साक्री गटशिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात

दोन महिन्यात दुसर्‍यांदा कारवाई : शिक्षण विभागाची लक्तरे वेशीवर : 31 पऑक्टोंबरला आरोपीची होती सेवानिवृत्ती


धुळे  (23 ऑक्टोबर 2024) : साक्री पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तथा धुळ्यातील प्राथमिक माध्यमिक विभागाचे वेतन व भविष्य निर्वाह निधी अधीक्षक महेंद्र गोपाळराव सोनवणे (58, रा. प्लॉट. नं.27, अनमोल नगर, राजीव गांधी शाळेजवळ, वाडीभोकर रोड, धुळे) यांना धुळे एसीबीने दोन लाखांची मागणी केल्याप्रकरणी बुधवारी दुपारी अटक केल्याने लाचखोर हादरले आहेत. विशेष म्हणजे अवघ्या दोन महिन्यांपूर्वी 20 ऑगस्ट रोजी धुळे वेतन अधीक्षक मीनाक्षी भाऊराव गिरी यांनादेखील दोन लाखांची लाच घेताना धुळे एसीबीने अटक केली होती हे विशेष!

असे आहे लाच प्रकरण
30 वर्षीय तक्रारदार यांचे ओम साई इंटरप्राइझेस या नावाने पिंपळनेर, ता.साक्री, जि.धुळे येथे दुकान आहे. या फर्ममार्फत तक्रारदार यांनी समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत बूट व पायमोजे पुरवठा साक्री तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांना केला होता व 40 लाखांच्या वस्तू पुरवठ्यापोटी अनुदान मागणीच्या फाईल जमा करून तक्रारदार यांनी पुरवठा केलेल्या वस्तुंचे बिल अदा करण्यासाठी एकूण बिलाच्या रकमेवर पाच टक्केप्रमाणे दोन लाखांची लाच 30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर रोजी महेंद्र सोनवणे यांनी मागितल्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली होती मात्र लाचेचा संशय आल्याने लाच स्वीकारण्यात आली नाही मात्र अहवाल येताच बुधवारी त्यांना अटक करण्यात आली.






यांनी केली कारवाई
धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली
हवालदार राजन कदम, पावरा आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

आठ दिवसांवर होती सेवानिवृत्ती
लाचखोर सोनवणे हे गुरुवार, 31 ऑक्टोंबर रोजी सेवानिवृत्त होणार होते मात्र त्यापूर्वीच त्यांच्यावर एसीबीने कारवाई केल्यानंतर शिक्षण विभागात प्रचंड खळबळ उडाली. यापूर्वी वेतन अधीक्षक मीनाक्षी गिरी यांनाही दोन लाखांची लाच घताना 20 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती व त्यांच्या घरात तब्बल 32 लाखांचे घबाड एसीबीला गवसले होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !