ठेका देण्याच्या नावाखाली तरुणाला साडेअकरा लाखांडा गंडा : जामनेरच्या भावंडांविरोधात गुन्हा
In the name of giving a contract, a youth was extorted eleven and a half lakhs: a crime against Jamner’s siblings अमळनेर (30 ऑक्टोबर 2024) : ऑप्टिकल फायबर पसरवण्याचा कंत्राट देतो, अशी बतावणी करून जामनेरच्या भावंडांनी तरुणाची 11 लाख 50 हजारात फसवणूक केली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे फसवणूक प्रकरण
विजय धनराज पाटील (रा.पवन चौक) येथे व्यंकटेश इंटरप्रायझेस नावाची फर्म आहे. 15 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी पाच वाजता त्यांच्या ओळखीचे जामनेर येथील राहुल दत्तात्रय चव्हाण, सागर दत्तात्रय चव्हाण या दोघांनी विजयच्या घरी येऊन तुम्हाला ऑप्टिकल फायबर कंत्राट देतो, असे सांगून 15 लाखांची मागणी केली. विजय यांनी टप्प्याटप्याने 11 लाख 50 हजार रुपये दिले मात्र दोघे चव्हाण बंधूनी ऑप्टिकल फायबर केबलचा ठेका दिला नाही. विजयने पैशाची मागणी केली असता दोघांनी तगादा लावू नको अन्यथा तुला संपवून टाकू, अशी धमकी दिली. अमळनेर पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक विकास देवरे करीत आहेत.