आमचे फोन आजही होताय टॅप : खासदार संजय राऊत यांचा आरोप


मुंबई (1 नोव्हेंबर 2024) : आमचे फोन आजही टॅप केले जात असल्याचा दावा खासदार संजय राऊऊत यांनी केला आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अनेक गंभीर आरोप केले. रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी आम्ही निवडणूक आचारसंहिता लागण्याच्या आधीपासून केली आहे मात्र, तरी देखील निर्णय घेतला जात नाही. रश्मी शुक्ला या आमच्या कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकार्‍यांवर खोटे गुन्हे दाखल करून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला.

पोलीस बंदोबस्तात उमेदवारांकडे पोहोचली रोकड
खासदार राऊत यांच्या दाव्यानुसार आचारसंहिता लागण्याच्या आदल्या रात्रीपर्यंत भाजप, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आपापल्या उमेदवारांकडे 15 ते 20 कोटी रुपये पोहोचवले व हे काम बंदोबस्तात झाले. राज्यात हेलिकॉप्टरने पैसे जातात. त्यांना कोण अडवणार? असा प्रश्न राऊत केला. जे काही दोन पाच कोटी रुपये पकडले जात आहेत, ते किरकोळ असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. राज्यात आता पोलिसांची वाहने देखील तपासली जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी हा आरोप केला आहे.

दीपोत्सवावर आक्षेप
सध्या निवडणुकीच्या आचारसंहिता सुरू आहे. अशावेळी दीपोत्सवाच्या माध्यमातून राजकीय प्रचार होत असेल तर त्याला विरोध करण्यात काहीही चुकीचे नसल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मनसेच्या वतीने आयोजित दिपोत्सवाच्या माध्यमातून त्या मतदारसंघांमध्ये नेत्यांची भाषणे होत आहेत. त्यामुळे त्यावर आक्षेप असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र विरोधी पक्षांना मदत
ज्या पक्षाकडून शिवसेनेची मते कापले जातील, त्यांना मदत करायची हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि भाजपचे धोरण असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. म्हणजेच महाराष्ट्राच्या विरोधामध्ये जे पक्ष असतील त्यांना मदत करणे, हे त्यांचे राष्ट्रीय धोरण असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.


कॉपी करू नका.