जळगावात वाहनात अवैध गॅस रिफिलिंग करताना स्फोट : चौघे भाजले

जळगाव (5 नोव्हेंबर 2024) : जळगावा ओमनीत अवैधरीत्या गॅस भरत असताना सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याने चौघे जण जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना आज मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेत चारचाकी ओमनीसह दुचाकी जळाल्याची प्राथमिक माहिती आहे.
अवैधरित्या गॅस भरताना स्फोट
जळगाव शहरातील काही भागात घरगुती गॅस सिलेंडरमधून गाड्यांमध्ये गॅस भरला जातो. रिक्षांमध्ये व ओमनी वाहनांमध्ये गॅस भरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात ओमनी या चारचाकी वाहनामध्ये घरगुती गॅस भरत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला व आग लागल्याने उभी असलेली चारचाकी वाहनासह एक दुचाकी जळून खाक झाली.