घड्याळाचा वाद : केस कोर्टात असल्याचे डिस्क्लेमर प्रकाशित करा


नवी दिल्ली (6 नोव्हेंबर 2024) : सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही गटांना कोर्टात वेळ वाया न घालता मतदारांना आकर्षित करण्यास सांगितले. घड्याळ निवडणूक चिन्हाचा मुद्दा न्यायालयात असल्याचे डिस्क्लेमर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी 36 तासांच्या आत वर्तमानपत्रात प्रकाशित करावे, असेही कोर्टाने बजावले.

सुप्रीम कोर्टात सुनावणी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाबाबत बुधवारी न्यायालयात सुनावणी झाली. राष्ट्रवादीत अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट असून शरद पवार यांनी ही याचिका दाखल केली आहे. अजित पवार गट न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत नाही, त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घड्याळ चिन्हाचा वापर करणे थांबवावे, असे त्यात म्हटले आहे. तसेच अजित पवार गटाला नवीन चिन्हासाठी अर्ज करण्याची सूचना द्यावी, अशी मागणी करण्यात आली.


कॉपी करू नका.