जळगावच्या अभिनव विद्यालयात विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू


जळगाव : शहरातील अभिनव विद्यालयातील दहावीचा विद्यार्थी ओम नारायण कोळी (16, रा.दिनकरनगर, आसोदा रोड) याचा मंगळवारी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. जेवणाच्या सुटीनंतर विद्यार्थी बाहेर पडत असताना ओमला ग्लानी आल्याने तो बेंचवर कोसळून बेशुद्ध झाल्यानंतर त्यास रुग्णालयात दाखल केल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्याचा सल्ला दण्यात आला. बेशुद्ध असतानाच वैद्यकीय महाविद्यालयात आणल्यानंतर डॉ.नितीन विसपुते यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. यानंतर शवविच्छेदन करून सायंकाळी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी जिल्हापेठ पोेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


कॉपी करू नका.