चोरवड तपासणी नाक्यावर बोलेरोसह 22 लाखांचा गुटखा जप्त

निवडणूक काळातही गुटखा तस्करी कायम : कारवाईने तस्करांच्या गोटात खळबळ


Gutkha worth 22 lakhs along with bolero seized at Chorwad check post रावेर (7 नोव्हेंबर 2024) : रावेर तालुक्यातील चोरवड तपासणी नाक्यावर पोलिसांनी गुटख्यासह सुमारे 22 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत रावेर पोलिसात दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

बंदी असलेल्या गुटख्याची सर्रास वाहतूक
पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना मध्यप्रदेशातील रावेरकडे वाहनातून महाराष्ट्रात बंदी असलेला विमल गुटखा येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यांनी रात्रीच्या गस्तीवर असलेले सहा.निरीक्षक अंकुश जाधव, कॉन्स्टेबल विशाल पाटील, रवींद्र भांबरे, सचिन घुगे, संभाजी बिजागरे यांना कारवाईच्या सुचना केल्या. चोरवड येथील विधानसभा निवडणुकीच्या अनुषगाने लावण्यात आलेल्या नाकाबंदी ठिकाणी जावून पथक थांबले. मध्यरात्रीनंतर दोन वाजेच्या सुमारास एक महिंद्रा बोलेरो कंपनीची चारचाकी (क्र.एम.एच.04 एच.वाय.6515) आल्यानंतर तिची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला सुगंधित केशर युक्त विमल गुटखा आढळला.

आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी
पोलिसांनी 22 लाख एक हजार 160 रुपये किंमतीच्या चारचाकी वाहनासह विमल गुटखा जप्त केला. याबाबत संभाजी बिजागरे यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रिजवान शेख रऊफ व शेख शोयब शेख शरीफ (दोघे रा. छत्री चौक पठाण वाडी, फैजपूर) यांना पोलिसांनी अटक केली. आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास सहा.निरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत.


कॉपी करू नका.