विरोधकांनी वृक्षारोपण करीत घातले सत्ताधार्यांच्या डोळ्यात अंजन
भुसावळातील जामनेर रोडवर राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी केले वृक्षारोपण
भुसावळ- सत्ताधारी विकासाच्या गप्पांमध्ये रंगले असतानाच विरोधकांनी मात्र पालिकेने आणलेल्या रोपांची वर्दळीच्या जामनेर रस्त्यावर लागवड करीत शहरवासीयांचे लक्ष वेधले आहे. शहरात पालिकेने आणलेल्या झाडांचा कुठलाही हिशेब न ठेवता वारेमाप वाटप झाल्याने मूळ मोहिमेला हरताळ फासली गेली असताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अष्टभूजा डेअरीचे संचालक नितीन धांडे यांनी जामनेर रोडवर अष्टभूजा मंदिरासमोर सुपारीची उंची झाडे लावत लक्ष वेधले आहे. पथदिव्यांसाठी असलेल्या डिव्हायडरमध्ये अद्यापपर्यंत झाडे पालिकेने लावली नसलीतरी धांडे यांनी झाडे लावल्याने त्यांच्या या उपक्रमाचे शहरवासीयांमधून कौतुक होत आहे. यावेळी यतीन पाटील, विशाल भंगाळे, मयूर चौधरी, निलेश लोखंडे, गणेश टेकावडे, वैभव पवार, अशोक टाक, विलास पगारे, बबलु बेलदार व नागरीक उपस्थित होते.