भुसावळातील प्रभाग 13 मध्ये सारंगधर पाटील व परिवाराकडून आमदार संजय सावकारे यांचे उत्स्फूर्त स्वागत

सलग चौथ्यांदा आमदार विजयाचा चौकार मारणार : मनीष पाटील यांचा विश्वास


भुसावळ (18 नोव्हेंबर 2024) :  भुसावळ विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार व भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ शहरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये रविवार, 17 रोजी प्रचार रॅली काढण्यात आली. प्रचार रॅलीचे प्रभागातील नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. वॉर्डातील रहिवासी तथा हॉटेल खालसा पंजाबचे संचालक सारंगधर पाटील व परिवारातर्फे आमदारांचे उत्स्फूर्तपणे यावेळी स्वागत करण्यात आले. आमदारांचे औक्षण करून त्यांना आशीर्वाद यावेळी देण्यात आले.


आमदार विजयाचा चौकार मारणार : मनीष पाटील
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे खजिनदार मनीष सारंगधर पाटील म्हणाले की, भुसावळ शहरात आमदार संजय सावकारे यांनी मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत. यंदाच्या निवडणुकीत आमदार संजय सावकारे मोठा लीड मिळवून निश्चितपणे विजयी होतील, असा विश्वास आम्हाला आहे.

प्रभाग क्रमांक 13 मधून निघाली रॅली
माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांच्या गांधी नगरातील घरापासून रॅलीला सुरूवात झाल्यानंतर फालक नगर, सरस्वती नगर, गुंजाळ कॉलनी, लक्ष्मी नगर, गडकरी नगर, शिवदत्त नगर, प्रल्हाद नगर, गुजर कॉलनी, रिंग रोड, शंभू राजे चौक, महाकाल चौक आदी भागातून प्रचार रॅली काढण्यात आली.

यांचा प्रचार रॅलीत सहभाग
प्रभाग क्रमांक 13 चे माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, उद्योजक मनोज बियाणी, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष गौरव राजेंद्र आवटे, हॉटेल खालसा पंजाबचे संचालक सारंगधर (छोटूभाऊ) पाटील, युवा मोर्चा खजिनदार मनीष सारंगधर पाटील, भाजपा व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष गुड्डू शेठ अग्रवाल, मोंटू अग्रवाल, भाजपा उत्तर भारतीय आघाडी जिल्हाध्यक्ष राजेश यादव, उत्तर भारतीय आघाडी भुसावळ शहराध्यक्ष वेदजी ओझा, वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष नरेंद्र भैय्या यादव, रवींद्र लेकूरवाळे, सुनील पाटील, लाजरस मनी, अंकुश वावरे, जितेंद्र डहाके, सुनील पाटील, शिव कैथवास, किशोर टोके, भाजपा वॉर्ड अध्यक्ष संध्याताई चंदेल तसेचयोगेश वाघ, अंकुश वावरे, संदीप यादव, गौरव वाघ, मोेंटू अग्रवाल, आकाश अग्रवाल,अंकुश पाटील, रवी शुक्ला, प्रल्हाद पवार, आर.आर.उपाध्ये, सुधीर ओझा सर, निगम सर, कृष्णकुमार लोधी, प्रमोद सिंग, लाजरस मणी यांच्यासह महायुतीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !