भुसावळ शहर व तालुक्यातील मराठा समाजाचा आमदार संजय सावकारे यांना जाहीर पाठिंबा
भुसावळ (18 नोव्हेंबर 2024) : भुसावळातील महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांना शहर व तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. आमदारांच्या जामनेर रोडवरील प्रचार कार्यालयात पदाधिकार्यांनी पाठिंब्याचे पत्र दिले.
मंगल कार्यालयासाठी निधी
आमदार सावकारे यांनी समाजाच्या मंगल कार्यालयासाठी एक कोटींचा निधी दिला आहे तसेच बांधकामासाठीदेखील एक कोटींचा निधी दिला आहे. यापुढेही आमदारांनी एक कोटींचा निधी देण्याचे आवाहन केल्याने तसेच 2015 मध्ये वरणगावातील मराठा समाजासाठी दहा लाखांचा निधी दिल्याचे पाठिंब्यातील पत्रात नमूद आहे.
यांच्या आहेत स्वाक्षर्या
पाठिंबा पत्रावर रवी ढगे, राजेंद्र आवटे, अॅड.तुषार पाटील, शैलेंद्र ठाकरे, अॅड.हरीष पाटील, ज्ञानेश्वर आमले, रवींद्र लोखंडे, किरण पाटील आदींच्या स्वाक्षर्या आहेत. यावेळी हॉटेल खालचा पंजाबचे संचालक सारंगधर पाटील, महायुतीतील पदाधिकारीदेखील उपस्थित होते.