शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातून विष्णू भंगाळे यांची हकालपट्टी


जळगाव (19 नोव्हेंबर 2024) : जिल्ह्यातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली.

शिंदे गटात प्रवेश करणार
दरम्यान, विष्णू भंगाळे यांनी पदाचा राजीनामा दिल्याची माहिती असून ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. जळगावात प्रचार शिगेला पोहोचल्यानंतर घटणार्‍या घडामोडींमुळे मात्र राजकीय वर्तुळाय खळबळ उडाली आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !