मंत्री गुलाबराव पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क


पाळधी (बुधवार, 20 नोव्हेंबर 2024) : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व महायुतीचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी बुधवारी आपल्या गावी पाळधी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

नेतृत्वाची जबाबदारी पार पाडत त्यांनी मतदारांना लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.


कॉपी करू नका.