भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी सहपरिवार बजावला हक्क


भुसावळ (20 नोव्हेंबर 2024) : भुसावळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व विद्यमान आमदार संजय सावकारे यांनी आपल्या कुटूंबासह बुधवार, 20 रोजी शहरात मतदानाचा हक्क बजावला.

आमदार सावकारे यांनी पत्नी रजनी सावकारे, आई सुशीलाबाई सावकारे, मुलगा युगांक सावकारे सह संत गाडगेबाबा शाळेत मतदानाचा हक्क बजावला.

उत्स्फूर्तपणे मतदानाचे आवाहन
लोकशाही सृदुढ होण्यासाठी मतदारांनी जास्तीत-जास्त संख्येने बाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन यावेळी आमदार संजय सावकारे यांनी केले.

 


कॉपी करू नका.