भुसावळ विधानसभेत विजय निश्चित : आमदार संजय सावकारे


भुसावळ (गुरुवार, 21 नोव्हेंबर 2024) : गेल्या तीन टर्मपासून भुसावळसह ग्रामीण भागातील जनतेचे प्रेम आपल्याला मिळत आले आहे व यावेळीदेखील मतदारांचा आपल्याला निश्चितपणे मतदानरुपी आशीर्वाद लाभला असून विजय आपलाच होईल यात कुठलीही शंका नाही, असे आमदार संजय सावकारे म्हणाले.

जनतेने यावेळी उत्स्फूर्तपणे बाहेर पडून मतदान केल्याने यंदा मतदानाचा टक्का वाढल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, आमदार संजय सावकारे यांनी आपल्या कुटूंबासह बुधवार, 20 रोजी शहरात मतदानाचा हक्क बजावला. आमदार सावकारे यांनी पत्नी रजनी सावकारे, आई सुशीलाबाई सावकारे, मुलगा युगांक सावकारे सह संत गाडगेबाबा शाळेत मतदानाचा हक्क बजावला.


कॉपी करू नका.