रावेर विधानसभेत विजयाचा शंभर टक्के विश्वास : महायुतीचे उमेदवार अमोल जावळे


रावेर (गुरुवार, 21 नोव्हेंबर 2024) : मतदारसंघातील लोकांनी मला नेहमीच प्रेम आणि सहकार्य दिले आहे. याच प्रेमाचा आणि विश्वासाचा आशीर्वाद मला मतदानाच्या रूपाने मिळेल, असा विश्वास महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांनी व्यक्त केला. विजयाचा शंभर टक्के विश्वास असून मतदारांनी आपल्याला विजयी केल्यास मतदारसंघाचा विकास वडिलांच्या स्वप्नांनुसार तसेच स्वतःच्या नव्या दृष्टिकोनातून मतदारसंघाचा निश्चितपणे विकास करण्यात येईल, असेही अमोल जावळे म्हणाले.

मतदारसंघाच्या विकासाला नव्या उंचीवर नेण्यासाठी माझे सर्व प्रयत्न असतील व स्व.हरिभाऊ जावळे यांच्या स्वप्नांना नवीन दिशा देण्याचा दृढ संकल्प असेल, असेही जावळे म्हणाले.


कॉपी करू नका.