दावे ठरवले फोल : जामनेरात भाजपाचे ‘संकटमोचक’ गिरीश महाजन सातव्यांदा विजयी


जामनेर (23 नोव्हेंबर 2024) : भारतीय जनता पक्षाचे नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सातव्यांदा जामनेर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला असून प्रतिस्पर्धी दिलीप खोडपे यांना त्यांनी 26 हजार 885 मतांचा लीड घेत पराभवाची धूळ चारली.

चुरशीच्या निवडणुकीत संकटमोचक विजयी
विधानसभेची ही निवडणूक आजवरची सर्वात चुरशीची, प्रतिष्ठेची आणि ‘सस्पेन्स थ्रीलर’ प्रकारात मोडणारी होती मात्र भारतीय जनता पक्षाचे नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपले डावपेच आखत जामनेरातून विजय मिळवला आहे.


सातव्यांदा मिळवला विजय
गिरीश महाजन यांना या निवडणुकीत एक लाख 28 हजार 667 तर प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे यांना एक लाख एक हजार 782 मते मिळाली. 26 हजार 885 मतांचा लीड घेत मंत्री गिरीश महाजन पुन्हा सातव्यांदा जामनेरातून विजयी झाले.

विजयासाठी सौभाग्यवतींनी खोचला पदर
जामनेरमध्ये मंत्री महाजन यांच्या प्रचाराची जबाबदारी त्यांच्या अर्धांगिनीसह पदाधिकारी यांनी स्वीकारली होती. महाजन यांनी डोअर टू डोअर प्रचारावर भर दिला. खोडपे यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पक्षाचे नेते शरद पवार, आमदार एकनाथ खडसे यांच्या सभा तर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा रोड शो झाला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !