भुसावळात दहावी परीक्षेसाठी गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात : इनरव्हीलचा मुन्सीपल हायस्कूलमध्ये उपक्रम


भुसावळ (24 नोव्हेंबर 2024) : शहरातील इनरव्हील क्लब ऑफ भुसावल रेल सिटीने शहरातील जामनेर रोडव्रील म्युन्सीपल हायस्कूलमधील पाच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या गरजू मुलींना दहावी बोर्डाचा परीक्षा फॉर्म भरण्यासाठी निधी देऊन सहकार्य करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यास इनरव्हील नेहमीच अग्रेसर असून यापुढेही गरजूंना मदत केली जाईल, असे इनरव्हील अध्यक्षा मीनाक्षी धांडे म्हणाल्या.

यांची होती उपस्थिती
यावेळी जया जितेंद्र पासी, यशोदा जितेंद्र पासी, ऐश्वर्या सुनील कोळी, विनिता रणजीत पासी, सोनम सुदाम पासी या विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक सुभाष गिर्धर मेढे यांनी इनरव्हीलचे आभार मानले. शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
इनरव्हील अध्यक्षा मीनाक्षी धांडे, सचिव किरण जावळे व इतर क्लब सदस्या उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !