उत्तर महाराष्ट्राला मोठी भेट : जळगाव-मनमाड चौथ्या व भुसावळ-खंडवा तिसर्या व चौथ्या रेल्वे लाईनला मंजुरी
रेल्वे मंत्री अष्णिवी वैष्णव यांची ऑनलाईद्वारे प्रसिद्धी माध्यमांना माहिती
Approval for Jalgaon-Manmad 4th and Bhusawal-Khandwa 3rd and 4th railway lines भुसावळ (27 नोव्हेंबर 2024) : मनमाड-जळगाव दरम्यान चौथ्या रेल्वे लाईनीला मंत्री मंडळाला मंजुरी दिली असून त्यासोबतच भुसावळ-खंडवादरम्यान तिसर्या आणि चौथ्या मार्गाला तसेच प्रयागराज-माणिकपूर दरम्यानच्या तिसर्या मार्गाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळाने मंजुरी दिल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवार, 26 रोजी दुपारी दोन वाजता ऑनलाईनद्वारे माध्यमांना दिली. ते म्हणाले की, या रेल्वे लाईनमुळे समृद्धी येणार असून रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवीन रेल्वे मार्गामुळे रेल्वे वाहतुकीवर येणारा ताण कमी होणार असून पर्यटन स्थळांनाही चालना मिळणार आहे,
उत्तर महाराष्ट्राला भेट : जळगाव-मनमाड चौथ्या मार्गाला मंजुरी
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या माहितीनुसार, मंत्री मंडळाच्या बैठकीत रेल्वेच्या तीन मोठ्या प्रकल्पांनाही मंजुरी मिळाली असून एकूण सात हजार 927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे लॉजिस्टिक्सचा खर्च कमी होईल, तेलाची आयात कमी होईल आणि कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनही कमी होईल, ज्यामुळे रेल्वे नेटवर्क अधिक चांगले आणि पर्यावरणपूरक होईल. मनमाड-जळगावदरम्यानच्या 160 किलोमीटर अंतराच्या चौथ्या मार्गाला मंत्री मंडळाने मंजुरी दिली असून त्यासाठी दोन हजार 773 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. भुसावळ-खंडवा दरम्यान 131 किलोमीटरच्या तिसर्या आणि चौथ्या मार्गाला मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी तीन हजार 514 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. प्रयागराज-माणिकपूर दरम्यान 84 किलोमीटरच्या तिसर्या मार्गाला मंजुरी देण्यात आली. यासाठी 1640 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.





