भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी रावेर नवनिर्वाचित आमदार अमोल जावळे यांचा केला सहृदय सत्कार


रावेर (27 नोव्हेंबर 2024) : रावेर मतदारसंघाचे नवनिर्वाचित युवा आमदार अमोल जावळे यांचा भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. रावेर मतदारसंघात चुरशीच्या लढाईत आमदार जावळे हे विजयी झाले होते व त्यांनी काँग्रेस उमेदवार धनंजय चौधरी यांचा 43 हजार 562 मतांनी पराभव करत मोठ्या फरकाने विजय मिळवल्याबद्दल फडणवीस यांनी जावळे यांचे विशेष कौतुक केले. यावेळी मंत्री गिरीश महाजन, चाळीसगावचे आमदार मंगेशदादा चव्हाण उपस्थित होते.

रावेर विधानसभेत भाजपाचे वर्चस्व
2019 च्या निवडणुकीत रावेर मतदारसंघ काँग्रेसकडे होता मात्र 2024 च्या निवडणुकीत अमोल जावळे यांनी काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. जावळे यांना एकूण एक लाख 13 हजार 676 मते मिळाली.


यावेळी फडणवीस यांनी रावेर मतदारसंघाच्या विजयाला अभिमानाचा अध्याय संबोधले आणि जावळे यांच्या कार्यकुशलतेचे विशेष कौतुक केले. या सत्कारप्रसंगी राज्याचे मंत्री गिरीश महाजन, चाळीसगावचे आमदार मंगेशदादा चव्हाण, तसेच भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपा आमदारांचे रावेरच्या विकासाचे व्हिजीन : मित्रा संस्थेच्या सीईओंची भेट
आमदार अमोल जावळे यांनी महाराष्ट्राच्या विकासाला समर्पित असलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (चखढठअ) संस्थेचे सीईओव माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांची भेट घेतली. या भेटीत रावेर विधानसभा क्षेत्रातील समस्या आणि त्यावरील उपायांवर सखोल चर्चा झाली. क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी योजना आखण्याचा निर्धार करण्यात आला.

जनतेला दिलेला शब्द पूर्ण करणार : आमदार
आमदार अमोल जावळे यांनी रावेर मतदारसंघाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी योगदान देण्याचा निश्चय या प्रसंगी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीत रावेर तालुक्याच्या विकासाचे व्हिजन आपण मांडले होते व निश्चितपणे आपण निवडणुकीत दिलेला प्रत्येक वचन पूर्ण करू व स्थानिक जनतेच्या विश्वासाला पात्र ठरू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !