जळगावातील रामानंद नगर पोलिसांची मोठी कारवाई : तीन गावठी पिस्तूलासह तिघांना अटक


Major action by Ramanand Nagar police in Jalgaon: Three arrested with three village pistols जळगाव (27 नोव्हेंबर 2024) : जळगावातील रामानंद पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे पिंप्राळा हुडको परिसरात कमरेला गावठी पिस्तूल लावून परिसरात दहशत माजविणार्‍या तीन जणांवर रविवार, 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी कारवाई करीत 75 हजार रुपये किंमतीचे तीन गावठी पिस्तूल व 3 जिवंत काडतूस जप्त केले. तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
पिंप्राळा हुडको परिसरात तीन जण गावठी पिस्तूल लावून परिसरात दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती रामानंद नगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई कारण्याच्या सुचना दिल्या. पथकाने सोमवार, 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता कारवाई करत संशयित आरोपी कल्पेश उर्फ प्रबुध्द गुलाब सपकाळे (21, रा.हुडको), गौरव समाधान सोनवणे (21, रा.गॅलेक्सी कॉलनी) आणि लिलाधर देविदास कोळी (35, रा.हिराशिवा कॉलनी) यांना अटक केली. त्यांच्याकडून 75 हजार रुपये किंमतीचे तीन गावठी पिस्तूल आणि तीन जीवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील करीत आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विठ्ठल पाटील, सहाय्यक फौजदार संजय सपकाळे, पोहेकॉ इरफान मलिक, सुशिल चौधरी, जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, पो.ना. हेमंत कळसकर, रेवानंद साळुंखे, विनोद सुर्यवंशी, रविंद्र चौधरी, उमेश पवार, पोलीस शिपाई जुलालसिंग परदेशी यांनी केली.


कॉपी करू नका.