भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचे वाचन
भुसावळ (27 नोव्हेंबर 2024) : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात 26 रोजी भारताच्या संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले तसेच 26 /11 हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य डॉ.आर.पी.फालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे करण्यात आले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.आर.बी.ढाके महिला कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.डॉ.संजय विठ्ठल बाविस्कर, प्रा.आर.डी.भोळे, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.श्रेया चौधरी, डॉ.गोविंदा पंडित वाघुळदे, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.राजेंद्र भोळे, प्रा.संजय देविदास चौधरी, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.अनिल सावळे, शिक्षकेतर कर्मचारी सुनील ठोसर, मिलिंद नेमाडे, सुधाकर चौधरी, राजेश पाटील, प्रमोद नारखेडे उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागाचे विद्यार्थी उपस्थित असल्याचे प्रसिद्धी प्रमुख डॉ.संजय धर्मा चौधरी कळवतात.