वरणगावातील वासुदेव नेत्रालयाची मतदार जनजागृती अभियानास मुदतवाढ


Vasudev Netralaya in Varangaon extends voter awareness campaign वरणगाव (2 डिसेंबर 2024) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा तसेच आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने वरणगाव शहरातील वासुदेव नेत्रालयाचे नेत्र तज्ञ डॉ.रेणुका पाटील आणि डॉ.नितु पाटील यांनी 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या काळात मतदार जनजागृती अभियान यशस्वीपणे राबविले.

बोटावरील शाई दाखवल्यास सवलत
मतदान करण्यासाठी मतदारांना 1 नोव्हेंबरपासून सवलत देण्यास सुरवात झाली होती तसेच मतदान झाल्यावर देखील पुढील 30 नोव्हेंबरपर्यंत नेत्रतपासणी फी सवलत देण्यात आली. मतदारांचा उत्साह पाहता आणि अभियानाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता तसेच नेत्ररुग्णांच्या विशेष मागणीवरून हे अभियान 21 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.म तदारांनी मतदान केल्यावर पुरावा म्हणून केवळ बोटावरील शाई दाखवल्यास सदर सवलतीचा फायदा घेता येईल, असे डॉ.नितु पाटील कळवतात.

पाटील दाम्पत्याने जोपासला सामाजिक वसा
डॉ.पाटील दाम्पत्य यांनी वासुदेव नेत्रालय 2014 मध्ये सुरू झाल्यापासून प्रत्येक लोकसभा, विधानसभा, जिल्हा परीषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत आदी विविध निवडणुकीत सदर उपक्रम राबवत असून आपले सामाजिक भान जोपासत आहे. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये राबवलेलेया उपक्रमाबद्दल भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाकडून वासुदेव नेत्रालाला विशेष गौरवपत्र प्राप्त झाले होते तसेच अलीकडे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून देखील गौरवपत्र मिळाले आहे.


कॉपी करू नका.