वरणगाव शहरातील नागरी समस्यांबाबत ‘मुख्याधिकार्‍यांना साकडे’

शिवसेनेतर्फे मुख्याधिकारी राऊत यांना दिले निवेदन; समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा


वरणगाव (4 डिसेंबर2024) : शहरात नवीन भागात पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन त्वरित टाकावी, नवीन नळ कनेक्शन देताना कुठलीही आडकाठी नागरिकांना करू नये, नागरि समस्या लवकर सोडवा अशा विविध समस्याचे निवेदन मंगळवार, 3 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन राऊत यांना शिवसेनेच्या वतीने देण्यात आले. या समस्या नाही सुटल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे.

अशा आहे मागण्या
मुख्याधिकारी सचिन राऊत यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वरणगाव शहरात नवीन पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन त्वरित द्यावे, गावात आणि कॉलनी भागात पिण्याचे पाण्याचे नळ कनेक्शनसाठी घेण्यासाठी नागरिकांना नगरपरिषदेमध्ये चकरा माराव्या लागतात, नागरिकांना त्वरित नळ कनेक्शन द्यावे आणि कोणत्याही प्रकारची आडकाठी त्यांना घालू नये, नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम काही भागात पूर्ण झाले असून त्या पाईपलाईन मधून नागरिकांना पाणी सोडण्यात यावे. गावात आणि कॉलनी परिसरात घंटा गाडी नियमित येत नसून सर्वदूर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गटार काढणारे स्वच्छता कर्मचारी यांना गटारीची स्वच्छता करण्यास सांगितल्यास ते महिलांशी हुज्जत घालून, ते म्हणता तुम्ही आमची कंप्लेंट करा अशा मगरूरीच्या भाषेत ते महिलांशी अरेरावी करतात. दररोज कचरा काढणारे आणि घंटागाडी नियमित येऊन या नागरी समस्या सुटाव्याज व समस्या नाही सुटल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे.

समस्यांचा वाचला पाढा
मुख्याधिकारी सचिन राऊत यांच्याकडे जिल्हाप्रमुख समाधान महाजन आणि पदाधिकारी यांनी घंटागाडी, स्वच्छता, पाणीपुरवठा, नळ कनेक्शन, नागरि सुविधा समस्यांचा पाढाच वाचला. मुख्याधिकारी राऊत यांनी तत्काळ या समस्यांचे निराकरण होईल, असे आश्वासन शिवसेना पदाधिकार्‍यांनी दिले.
यावेळी भुसावळ तालुका विधानसभा प्रमुख संतोष माळी, तालुका संघटक सुरेश चौधरी, जिल्हा संघटक निलेश सुरडकर, वरणगाव शहर संघटक दुर्गेश बेदरकर, अल्पसंख्यांक शहरप्रमुख अशफाक खाटीक, युवा उप शहरप्रमुख पंकज पाटील, राहुल इंगळे आदी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.


कॉपी करू नका.