नंदुरबार गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी हेमंत पाटील


Hemant Patil appointed as Senior Police Inspector of Nandurbar Crime Branch नंदुरबार (4 डिसेंबर 2024) : नंदुरबार गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी हेमंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी 3 रोजी काढले आहेत.

किरण खेडकर यांच्याकडे आर्थिक शाखेची जवाबदारी
नंदुरबार गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण खेडकर यांच्या नंदुरबार आर्थिक गुन्हे शाखेची जवाबदारी सोपवण्यात आली असून त्यांच्याकडील गुन्हे शाखेची जवाबदारी आता जळगाव नियंत्रण कक्ष व सायबर सेलचे प्रभारी अधिकारी हेमंत सुभाष पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली.

अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल : पित्याचा चालवताय वारसा
हेमंत पाटील यांचे वडील सुभाष पाटील हेदेखील पोलीस दलात कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल केली व त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज निरीक्षक हेमंत पाटील मार्गक्रमण करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी गडचिरोली, गोदिंया, जळगाव शनीपेठ, एलसीबी, वाशिम, धुळे येथे सेवा बजावली आहे तर अलीकडेच त्यांनी नाशिक ग्रामीणमध्ये एलसीबी निरीक्षकपदाची धूरा यशस्वीपणे बजावून अनेक गुन्ह्यांची उकल केल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक आजही केले जाते.

प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा करणार : हेमंत पाटील
नंदुरबार गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये गुन्हे शाखेची धूरा स्वीकारली असून प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा करण्यावर आपला अधिक भर असेल.


कॉपी करू नका.