मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस…..शपथ घेतो की…!

राज्याच्या मुख्यमंत्रपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे व अजित पवार


 मुंबई (5 डिसेंबर 2024)  : देवेंद्र फडणवीस यांनी तिसर्‍यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री तर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री होणारे शिंदे हे दुसरे नेते आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर बहुप्रतीक्षीत शपथ विधी सोहळा गुरुवारी झाला. राज्यपालांनी उभयंतांना शपथ दिली.

यांची सोहळ्याला उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक भाजप नेते या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. याशिवाय भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येथे पोहोचले आहेत. याशिवाय देशभरातील 400 संत-मुनी सहभागी झाले आहेत.


महाराष्ट्रातील निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजीा लागला. महायुती म्हणजेच भाजप-शिवसेना शिंदे-राष्ट्रवादी पवार यांना 230 जागांचे प्रचंड बहुमत मिळाले आहे.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !