मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितले ; मराठा समाजाला आरक्षण द्या अन्यथा आंदोलन निश्चित


आंतरवाली सराटी (6 डिसेंबर 2024)  5 जानेवारीपर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्या अन्यथा आंदोलन अटळ असल्याचा इशारा मराठा आंदोलक व मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारच्या स्थापनेनंतर पुन्हा सरकारला दिला आहे.

अन्यथा सरकारला सोडणार नाही
जरांगे म्हणाले की, नवे सरकार स्थापन झाले आहे. आता जनतेचे प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे. समाजात जे घडत आहे, ते त्यांना दिसत नसेल, पण भयंकर सुप्त लाट आहे. हे लक्षात आल्यास त्यांना धक्का बसेल. 5 तारखेला त्यांचे सरकार स्थापन झाले आहे, आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तिघांचेही मनापासून अभिनंदन केले आहे. आता पुढील काळात गोरगरिबांचे प्रश्न मार्गी काढायचे, आता येत्या पाच तारखेपर्यंत एक महिन्याचा कालावधी आहे. 5 जानेवारीपर्यंत त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढायचा, असा अल्टिमेटम मनोज जरांगे यांनी महायुती सरकारला दिला. असे केले नाही, तर मराठे तुफान ताकदीने उभे राहून सरकारला त्रास देणार, सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.


केसेस मागे घेण्याची सूचना
दरम्यान, 5 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढायचा. मराठा आणि कुणबी एक आहेत. 2004 चा अध्यादेश आहे, त्यातही दुरुस्ती करायची. सगेसोयरेची अंमलबजावणीही करायची. हैदराबाद गॅझेट, सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेट, लाखो मुलांवर केस झाल्या आहेत, त्या मागे घ्यायच्या, अशी सूचना वजा आदेशच मनोज जरांगे यांनी महायुती सरकारला दिला आहे.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !