जळगावात एमआयडीसी निरीक्षक दत्तात्रय निकम यांची नियंत्रण कक्षात बदली


MIDC Inspector Dattatreya Nikam transferred to the control room in Jalgaon जळगाव (7 डिसेंबर 2024) : जळगावातील अवैध गैस रिफिलिंग केंद्रावर झाललेया स्फोटात तब्बल सात जणांचा बळी गेल्यानंतर जिल्हा पोलीस दलावर टिकेची झोड उठली होती. तब्बल महिनाभरानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याची दखल घेत एमआयडीसी निरीक्षक दत्तात्रय निकम यांची जिल्हा नियंत्रण कक्षात बदली केल्याने कर्मचार्‍यांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. दुय्यम अधिकार्‍याकडे येथला पदभार देण्यात आला आहे.

अवैध रिफिलिंग सेंटरवर झाला होता स्फोट
इच्छादेवी चौकाजवळ महामार्गलगत अवैध गॅस भरणा करताना स्फोट झाला व या दुर्घटनेत जखमी झालेल्या तब्बल सात लोकांना जीव गमवावा लागला. या दुघटनेनंतर तत्काळ दोन कर्मचार्‍यांची बदली करण्यात आली व घटनेची व्याप्ती आणि होत असलेली टीका लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या बदलीचे आदेश जारी केले.

लवकरच निरीक्षकांची नेमणूक
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांची शनिवारी जिल्हा नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. सध्या दुय्यम अधिकार्‍याकडे पदभार स्वीकारण्यात आला असून लवकरच नवीन अधिकार्‍याची नेमणूक करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी म्हणाले.


कॉपी करू नका.