पहिल्या पतीपासून घटस्फोट नसताना लग्न : वराडसीमच्या महिलेसह आठ संशयीतांविरोधात गुन्हा

Marriage without divorce from first husband : Case filed against eight suspects including a woman from Varadsim भुसावळ (13 मार्च 2025) : पहिल्या पतीपासून घटस्फोट झाला नसताना तसे भासवून कोरोना काळात लग्न करून भुसावळातील मूळ रहिवासी व हल्ली बदलापूरस्थित 47 वर्षीय प्रौढाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी वराडसीम गावातील महिलेसह तिच्या कुटूंबियांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे नेमके प्रकरण
प्रसाद उर्फ आशिष रमेश झोपे (47, म्युन्सीपल पार्क, सावरकर रोड, भुसावळ, ह.मु.बदलापूर, पश्चिम अंबरनाथ, मुंबई) यांच्या तक्रारीनुसार, फेब्रुवारी 2020 ते एप्रिल 2022 दरम्यान कोरोना काळात त्यांचा विवाह वराडसीम येथील गौरी ढाके सोबत झाला. लग्नावेळी त्यांना महिलेचा घटस्फोट झाल्याचे सांगण्यात आले मात्र प्रत्यक्षात घटस्फोट झाला नसल्याचे समोर आले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रसाद झोपे यांनी भुसावळ ताालुका पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यावरून संशयीत गौरी उर्फ रत्ममाला मोरेश्वर ढाके (वराडसीम, ता.भुसावळ), विजया मोरेश्वर ढाके (वराडसीम), लीना सुनील काळे (अयोध्या नगर, जळगाव), अनिल अवधू काळे (अयोध्या नगर, जळगाव), दीपक मोरेश्वर ढाके (वराडसीम), पुष्पक मोरेश्वर ढाके (माऊली नगर, जळगाव), सोपान शालिक ढाके (जळगाव), ज्ञानदेव शालिक ढाके (जळगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार योगेश भानुदास पालवे करीत आहेत.




