जळगाव ग्रामीणमधील पराभवानंतर गुलाबराव देवकरांचा मोठा निर्णय : अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय !


Gulabrao Deokar’s big decision after defeat in Jalgaon Rural जळगाव (8 डिसेंबर 2024) : विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीणमधून पराभूत झालेले उमेदवार गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) यांनी राष्ट्रवादीतच मात्र अजित पवार गटांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. जळगावातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर हे अजित पवार गटात प्रवेश करणार असून त्यांच्यासह सुमारे पाच हजार कार्यकर्ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची साथ सोडतील याबाबत आता ठाम निर्णय झाला आहे. या निर्णयामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची देवकर यांनी घेतली भेट
अजित पवार गटात जाणार असल्याचं गुलाबराव देवकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे. माजी मंत्री, जळगावातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर हे अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची देवकर यांनी भेट घेतली. सोमवारी ते अजित पवार यांची भेट घेणार आहेत. अजित पवार यांच्या भेटीनंतर प्रवेश सोहळा कधी आणि कुठे घ्यायचा याबद्दलचा निर्णय होईल, अशी माहिती गुलाबराव देवकर यांनी दिली आहे.


काय म्हणाले गुलाबराव देवकर ?
चिंतन बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी सत्तेत जायला हवं अस सांगितलं होत. यावेळी अजित पवार गटात जाण्याबद्दल निर्णय घेतला होता. कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार अजित पवार गटात प्रवेश करत आहे. जळगाव ग्रामीण मतदार संघातले तसेच जिल्ह्यातले अनेक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हे अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत, अस गुलाबराव देवकर यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का पचवत नाही, तोच जळगाव जिल्ह्यात गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते अजित पवार गटात जाणार असल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !