जळगाव जिल्ह्यात सीसीआयचे 11 कापूस खरेदी केंद्र सुरू
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांना यश

CCI opens 11 cotton procurement centers in Jalgaon district मुक्ताईनगर (8 डिसेंबर 2024) : जळगाव जिल्ह्यातील 11 ठिकाणी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) ‘कापूस खरेदी केंद्र’ सुरू करण्यात आले असून त्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. भारतीय कापूस महामंडळामार्फत शेंदुर्णी, जामनेर, बोदवड, भुसावळ, चोपडा, पाचोरा, चाळीसगाव, जळगाव, धरणगाव, एरंडोल व पारोळा अशा एकूण 11 ठिकाणी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) चे कापूस खरेदी केंद्र सुरू झाले आहेत.
मुक्ताईनगरात लवकरच होणार खरेदी
भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) मार्फत एफएक्यू प्रतीच्या कापसाची किमान हमी दराने खरेदी सुरू आहे. कापूस उत्पादक शेतकर्यांच्या मागणीनुसार जळगाव जिल्ह्यांतर्गत प्रत्येक तालुक्यावर कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबाबत मंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडै मागणी केली मात्र काही त्रांत्रिक अडचणीमुळे काही तालुक्यावर केंद्र सुरू होणार नसलेतरी मुक्ताईनगर येथे लवकरच खरेदी केंद्र सुरू होणार असल्याचे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून कळविण्यात आले आहे. 11 केंद्रावर संबंधित विभागाच्या अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


